Ad will apear here
Next
‘चित्रपट चावडी’ कार्यक्रमात ‘ए समर्स टेल’ चित्रपट
नाशिक : ‘चित्रपट चावडी’ या उपक्रमांतर्गत २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘ए समर्स टेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

विविध ऋतूंवर आधारित कथानकांच्या मालिकेतील, एरिक रोहमर यांची ‘ए समर्स टेल’ ही नर्मविनोदी प्रेमकथा आहे. गणिताचा तरुण विद्यार्थी, पण गिटारवादनाचा छंद असलेला गॅस्पार्ड व त्याची मैत्रीण लेना यांच्या ˆस्पेनमधील भेटीदरम्यान त्याची आणखी दोन स्त्रियांशी गाठ पडते. तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या भेटीमुळे गोंधळात पडलेला गॅस्पार्ड त्यातून कसा मार्ग काढतो याविषयीची ही रंजक कथा आहे. १९६६मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक तास ५७ मिनिटांचा आहे. 

एरिक रोहमर तत्कालीन नवीन चित्रपटांच्या लाटेमधील  अपरिचित, पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहेत. चाळीसहून अधिक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खास फ्रेंच ठसा असलेला एरिक यांचा चित्रपट थेट आशयाला भिडणारा, सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सहज घटना टिपणारा आहे. त्यांच्या चित्रपटातून आपल्याला सौंदर्यदृष्टी, नातेसंबंधाची जाणीव सहजपणे जाणवते.

‘ए समर्स टेल’ हा चित्रपट बघण्यास रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
‘ए समर्स टेल’ चित्रपटाचे सादरीकरण
दिवस : शुक्रवार, २१ जुलै २०१७
वेळ : सायंकाळी साडेसहा वाजता
स्थळ : डिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), 
ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZGGBE
Similar Posts
चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘डियर डायरी’ चित्रपट नाशिक : ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘डियर डायरी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०
‘चित्रपट चावडी’वर पाहा ‘टू डेज वन नाइट’ नाशिक : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र व नाशिक येथील विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८, कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी, १६ जून २०१७ रोजी सायंकाळी
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा नाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोल्हापूरचे संजय हळदीकर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाविषयी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language